कांदा उत्पादक चिंतित; दरवाढीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:17 AM2021-04-15T04:17:58+5:302021-04-15T04:17:58+5:30

शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची लागवड केली आहे; परंतु मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला होता. ज्या ...

Onion growers worried; Pay attention to the price increase | कांदा उत्पादक चिंतित; दरवाढीकडे लक्ष

कांदा उत्पादक चिंतित; दरवाढीकडे लक्ष

Next

शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची लागवड केली आहे; परंतु मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला होता. ज्या भागात गारपीट झाली, तेथील कांदा पिकाचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात आता कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात ५९६ हेक्टर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली होती. मागील पंधरा दिवसांपासून ओला कांदा शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहे. जिल्ह्यातील शेतकरी कांदा दरवाढीच्या प्रतीक्षेत आहे. बाहेर जिल्ह्यातूनही बाजार समितीत कांद्याची आवक सुरू आहे. अशातच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे काढणी करून साठवणूक केलेल्या व काढणीला आलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले. दर कमी व अवकाळी पाऊस असा दुहेरी मार शेतकऱ्यांवर बसत आहे.

--बॉक्स--

दोन महिन्याआधी होते ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल दर

बाजारात कांदा आवक घटल्याने कांद्याला ३५००-४५०० प्रति क्विंटल दर मिळत होता; मात्र दोन महिन्यापासून कांद्याचे दर सतत घसरत आहे. आता नवीन कांदा बाजारात येत असल्याने आवकही वाढली आहे.

Web Title: Onion growers worried; Pay attention to the price increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.