कांद्याचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:24+5:302021-05-03T04:14:24+5:30

अकोला : रब्बी हंगामात सुरुवातीपासून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली होती. कांद्याला १५ ते २० रुपये ...

Onion prices fell | कांद्याचे भाव उतरले

कांद्याचे भाव उतरले

Next

अकोला : रब्बी हंगामात सुरुवातीपासून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली होती. कांद्याला १५ ते २० रुपये किलो दर मिळत आहे. तीन ते चार हजार प्रतिकिलोप्रमाणे शेतकऱ्यांनी कांदा बी खरेदी केले.

-----------------------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

अकोला : राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणे तसेच ग्राहकांना देण्यावर निर्बंध आहे. काही महिने प्लास्टिक पूर्णपणे बंद होते. मात्र, आता बाजारामध्ये सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे.

-----------------------------------------------

ग्रामीण भागातील लग्नात गर्दी

अकोला : कोरोनाचा कहर वाढल्याने लग्न समारंभांना परवानगी घेऊन फक्त २५ जणांच्याच उपस्थितीत सोहळा आटोपण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. ग्रामीण भागात हे पथ्य पाळले जात नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शेकडोंची गर्दी होत आहे.

..........

पीक कर्जवाटपाचे दर निश्चित

अकोला : खरीप २०२१ करिता प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्यस्तरीय समितीद्वारा पीकनिहाय कर्जदर जाहीर केले आहेत. आगामी पीकस्थिती, पाऊस व सर्व स्थितीचे अवलोकन करून जिल्हा अग्रणी बँकेद्वारा यंदाच्या खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे लक्षांक निश्चित केले जाणार आहे.

.............

हमीभावाने तुरीची खरेदी नाही!

अकाेला : जिल्ह्यात सात ठिकाणी आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती; मात्र हमीभावापेक्षा अधिक दर बाजार समितीत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीत तूर विक्रीस पसंती दिली. त्यामुळे हमीभावाने जिल्ह्यात शून्य खरेदी झाली.

...........................

तुरीच्या दरवाढीने आवक वाढली

अकाेला : शेतकऱ्यांकडून पुढील खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. तुरीचा हंगाम संपून महिने लोटले आहेत. तरीही, बाजार समितीत तुरीची आवक सुरू आहे. बाजार समितीत १ हजार ३७६ क्विंटल तुरीची आवक झाली. गेल्या महिन्यातील सर्वाधिक आवक होती.

.................

सौर कृषिपंप जोडणी वाढली

अकोला : कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य दिल्याने वऱ्हाडातील ८ हजार १२१ शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.

.................

जिल्ह्याला ७८ हजार मे. टन साठा

अकोला : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्याला ७७,९९० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ९५ हजार ७०० टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती.

.........

कोरोना उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

..................................................

‘शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा’

अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची नावे, पत्ता, आदी माहितीमधील त्रुटींची दुरुस्ती करून याद्या अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या नायब तहसीलदारांना दिले.

...............................................

दंडात्मक कारवाईची घेतली माहिती

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

.....................

वातावरणातील बदलाचा आराेग्याला फटका

अकोला : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसा ऊन, तर रात्री वादळी वारा आणि ढगाळ वातावरणाचा आरोग्याला फटका बसत आहे. अनेकांना सर्दी, खोकल्यासह अंगदुखीच्या समस्या येत आहेत.

Web Title: Onion prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.