फेब्रुवारीपासून कांदा अनुदान मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 06:32 PM2019-03-12T18:32:57+5:302019-03-12T18:33:03+5:30
अकोला: कांदा अनुदान अर्ज सादर करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
अकोला: कांदा अनुदान अर्ज सादर करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
यावर्षी कांदा उत्पादनावर प्रतिक्विंटल २०० रुपये २०० क्विंटलपर्यंत अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. तथापि, फेब्रुवारी महिन्यात विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान योजनेत घेणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता; पण कांदा उत्पादकांना सरसकट फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये कांदा विकला त्यांचे अनुदान मंजुरीचे अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. आता फेबुवारीत कांदा विक्री केला, त्याचेही अनुदान मंजुरीचे अर्ज येत्या ३१ मार्चपूर्वी बाजार समितीकडे सादर करावयाचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१९ ही शासनाने निश्चित केली आहे.
अनुदान अर्जासोबत कांदा विक्री पावतीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला सात-बारा उतारा, राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा सहकारी खासगी बँकेपैकी ज्या बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेत या पासबुकाची पहिल्या पानाची आयएफएससी कोडसह आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये सात -बारा उताºयावर वडिलाचे नाव व विक्री पावती मुलाचे व अन्य कुटुंबीयाची नावे त्याकरिता शपथपत्र जोडणे आवश्यक करण्यात येत आहे.
- कांदा अनुदान योजनेसाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकºयांना अनुदान मंजुरीचे अर्ज बाजार समितीकडे सादर करावे.
शिरीश धोत्रे,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.