१२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज

By admin | Published: August 18, 2015 01:27 AM2015-08-18T01:27:14+5:302015-08-18T01:27:14+5:30

अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट.

Online application for 12th test | १२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज

१२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज

Next

बुलडाणा: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मार्च २0१६ मध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांंना परिक्षा फॉर्म शाळेमध्ये भरून द्यावे लागत होते. यावर्षीपासून प्रथमच परिक्षा फॉर्म ऑनलाईन भरावे लागणार आहेत. अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून, अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अर्ज भरण्यासाठी १२ ते १५ दिवस शिल्लक असून, सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली. ऑनलाईनची अडचण दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही., असली तरी सुरळीत राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी तासन्तास बसावे लागते. कधी कनेक्टीव्हीटी मिळत नाही, तर कधी सर्व्हर डाउन राहते. अशा विविध अडचणींचा सामना विद्यार्थ्यांंना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी येवून अर्ज दाखल करीत आहेत. चलानाद्वारे भरावे लागणार शुल्क परीक्षेचा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शुल्क भरल्यानंतर महाविद्यालयास विद्यार्थ्यांंची यादी बोर्डाकडे सादर करावी लागणार आहे. आधार कार्डाची आवश्यकता नाही ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्ये आधार क्रमांकासाठी जागा ठेवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांंकडे आधार क्रमांक उपलब्ध आहे, त्यांनी तो भरावा; मात्र आधार क्रमांक भरणे सर्वांंना बंधनकारक नाही., असे मंडळाने स्पष्ट केले आहे. १२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट. बुलडाणा: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मार्च २0१६ मध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांंना परिक्षा फॉर्म शाळेमध्ये भरून द्यावे लागत होते. यावर्षीपासून प्रथमच परिक्षा फॉर्म ऑनलाईन भरावे लागणार आहेत. अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून, अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अर्ज भरण्यासाठी १२ ते १५ दिवस शिल्लक असून, सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली. ऑनलाईनची अडचण दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही., असली तरी सुरळीत राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी तासन्तास बसावे लागते. कधी कनेक्टीव्हीटी मिळत नाही, तर कधी सर्व्हर डाउन राहते. अशा विविध अडचणींचा सामना विद्यार्थ्यांंना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी येवून अर्ज दाखल करीत आहेत. चलानाद्वारे भरावे लागणार शुल्क परीक्षेचा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शुल्क भरल्यानंतर महाविद्यालयास विद्यार्थ्यांंची यादी बोर्डाकडे सादर करावी लागणार आहे. आधार कार्डाची आवश्यकता नाही ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्ये आधार क्रमांकासाठी जागा ठेवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांंकडे आधार क्रमांक उपलब्ध आहे, त्यांनी तो भरावा; मात्र आधार क्रमांक भरणे सर्वांंना बंधनकारक नाही., असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Online application for 12th test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.