उमेदवारी अर्ज आता ऑनलाईन प्रणालीद्वारे!

By admin | Published: January 14, 2017 12:43 AM2017-01-14T00:43:44+5:302017-01-14T00:43:44+5:30

अकोला मनपा निवडणूक; ऑनलाईन अर्ज सादर करताना उडणार उमेदवारांची उडणार धांदल.

Online application for candidature now! | उमेदवारी अर्ज आता ऑनलाईन प्रणालीद्वारे!

उमेदवारी अर्ज आता ऑनलाईन प्रणालीद्वारे!

Next

अकोला, दि. १३- महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर (संकेतस्थळ) ऑनलाईन प्रणालीद्वारे इच्छूकांना उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारांची धांदल उडणार असल्याचे निश्‍चीत मानल्या जात आहे.
काळ्य़ा पैशांना आळा बसण्यासह कर चोरीला लगाम लावण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांसाठी ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निश्‍चीतच पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्याने इच्छूकांची धांदल,गोंधळ उडणार हे मानल्या जात आहे. ऑनलाईन अर्जामध्ये इच्छूक उमेदवारांनी इत्थंभूत माहिती सादर केल्यानंतर त्याची निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट)नोंद होईल. नोंद झाल्यानंतर सादर केलेल्या अर्जाची प्रत मनपा निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सोपवावी लागेल. त्यावेळी अर्जाच्या प्रतीसोबत शपथपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याची माहिती आहे.

काळजीपूर्वक भरा; दुरुस्ती होईल!
इच्छूक उमेदवारांपैकी अनेकांचा संगणक, इंटरनेट वापराशी संबंध आला नसेल तर त्यांची काही अंशी धांदल उडेल, यात दुमत नाही. संगणक,इंटरनेट वापराचे ज्ञान असणार्‍या व्यक्तीकडूनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून घ्यावा. निवडणुकीचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरताना त्यामध्ये काही चूका होऊन अर्जाची नोंद झाल्यास उमेदवारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा अर्जातील त्रुट्या दुर करता येतील. त्यासाठी संबंधित उमेदरावाला विशिष्ट क्रमांक दिला जाईल.

१५ अधिकार्‍यांची चमू होणार कार्यरत
निवडणूक लढविणार्‍या इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे,त्यातील त्रुट्या दुर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह १५ अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये पाच निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्या दिमतीला प्रत्येकी दोन शासकीय अधिकार्‍यांची नेमणुक केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश उद्या शनिवारी किंवा सोमवारी प्राप्त होतील.

Web Title: Online application for candidature now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.