जिल्हय़ात ९0 हजारांवर शेतकर्‍यांनी भरले ऑनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:25 AM2017-09-06T01:25:38+5:302017-09-06T01:26:14+5:30

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळ पर्यंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी आहे.

Online application filled by farmers in 90 thousand in the district! | जिल्हय़ात ९0 हजारांवर शेतकर्‍यांनी भरले ऑनलाइन अर्ज!

जिल्हय़ात ९0 हजारांवर शेतकर्‍यांनी भरले ऑनलाइन अर्ज!

Next
ठळक मुद्देकर्जमाफी ७२ हजार शेतकर्‍यांचे अर्ज बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळ पर्यंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी आहे.
 सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या  शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे  पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्या त येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे  काम  गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक  सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंंत असून, या मुदतीत  कर्जमाफीसाठी जिल्हय़ातील पात्र १ लाख ६३ हजार थकबाकीदार  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ स प्टेंबर रोजी सायंकाळपर्यंंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्यात आले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्हय़ा तील ७२ हजार २९८ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम  अद्याप बाकी आहे. 

अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करा; 
अपर जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामाचा आढावा संनियंत्रण समितीच्या बैठकीत मंगळवारी  अपर जिल्हाधिकारी राजेंद्र खवले यांनी घेतला. कर्जमाफी योजनेत शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे  निर्देश अपर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील सेतू केंद्र संचालकांना  यावेळी दिले. या बैठकीला समितीचे सदस्य जिल्हा पुरवठा अधिकारी  संतोष शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र इंगळे व संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Online application filled by farmers in 90 thousand in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.