कर्जमाफीतही ‘आॅनलाइन’चे अडथळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:22 AM2017-08-01T02:22:14+5:302017-08-01T02:26:11+5:30

अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांकडून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरुन घेण्यात येत असून, ‘आपले सरकार ’पोर्टल वर आॅनलाइन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी ’चा....

'Online' barriers to the loan! | कर्जमाफीतही ‘आॅनलाइन’चे अडथळे!

कर्जमाफीतही ‘आॅनलाइन’चे अडथळे!

Next
ठळक मुद्देअर्ज भरण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे!अनेक शेतक-यांचे ‘आधार लिंक’च नाही!जिल्ह्यात केवळ ५९० शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज!

संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांकडून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरुन घेण्यात येत असून, ‘आपले सरकार ’पोर्टल वर आॅनलाइन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी ’चा अभाव, वारंवार ‘लॉग आऊट’ होणारे पोर्टल व इतर कारणांमुळे ‘आॅनलाइन ’ अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे कर्जमाफी योजनेत आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकºयांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकºयांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली. महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतींचे आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)केंद्रांमार्फत शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरुन घेण्यात येत आहेत; परंतु कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन अर्ज भरुन घेताना, ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन असल्याने, नेट कनेक्टीव्हीटीच्याअभावी आपले ‘सरकार पोर्टल ’वारंवार लॉगआऊट होते, तसेच पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास कमालीचा विलंब होत आहे, त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याकरिता महा- ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकºयांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.

Web Title: 'Online' barriers to the loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.