कौशल्य विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:50+5:302021-02-26T04:24:50+5:30
या मेळाव्यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरिता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता धारक ...
या मेळाव्यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरिता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना संधी उपलब्ध असेल. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली यो. बारस्कर यांनी केले आहे
भरतीया रूग्णालयात नागरिकांची स्वॅब तपासणी
अकोला- काेराेनाच्या वाढत्या उद्रेकामुळे रूग्ण शाेध माेहीम राबविली जात असून महापालिकेच्या भरतीया रूग्णालयात नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यास सुरवात झाली आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रभाकर मृदगल यांच्या नेतृत्वातील चमू कार्यरत आहे
महसूल मंडळ अधिकाऱ्याची चाैकशी करा
अकोला- बार्शीटाकळी येथील महसूल मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पारस्कर यांच्या दप्तराची चाैकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुराध ठाकरे व सहकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सिंधी काॅलनीत जनजागृती
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही मास्क न लावणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळावे असे आवाहन समाजसेवक मनाेहर पंजवाणी यांनी केले असून त्यांनी सिधी काॅलनीत काेराेनाबाबत जनजागृती केली.
प्रवाशांची गर्दी कायमच
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने लाॅकडाऊन घाेषित केले आहे मात्र या दरम्यानही प्रवाशांची संख्या वाढतीच असून बसस्थानकावर गर्दी हाेत असल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. बसमध्ये चढताना प्रवाशांमध्ये शिस्त नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगला खाे दिला जात आहे.
फळांची मागणी वाढली
अकाेला: शहरात लाॅकडाऊनमुळे दुपारी तीन वाजेपर्यंतच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान नागिरकांकडून माेठ्या प्रमाणात फळे खरेदी करण्यास पसंती दिली जात असल्याचे समाेर आले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून टरबुजांची विक्री आतापासूनच वाढल्याचे दिसत आहे.
झिंगराजी महाराज यात्रा महाेत्सव रद्द
अकाेला- म्हस्केवाडी येथील झिंगराजी महाराज यात्रा महाेत्सव २७ फेब्रुवारी राेजी हाेता. मात्र काेराेनाच्या वाढत्या प्रसारामुळे हा महाेत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अशाेक वामन म्हस्के यांनी प्रसिद्धीस दिली आहे. मंंदिर परिसरातच विधीवत पूजा करून हा महाेत्सव काेराेना नियमातच साजरा केला जाणार आहे.