कुरणखेड ग्रामपंचायतीची ऑनलाइन ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:37+5:302021-03-19T04:17:37+5:30

सरपंचपदाचा पदभार स्वीकारताच, गावातील मुख्य चांदणी चौकातील अनेक वर्षांपासून नालीचा प्रश्न कायम होता. सरपंचांनी पुढाकार घेत, नालीचे पाणी अंगणातच ...

Online Gram Sabha of Kurankhed Gram Panchayat | कुरणखेड ग्रामपंचायतीची ऑनलाइन ग्रामसभा

कुरणखेड ग्रामपंचायतीची ऑनलाइन ग्रामसभा

Next

सरपंचपदाचा पदभार स्वीकारताच, गावातील मुख्य चांदणी चौकातील अनेक वर्षांपासून नालीचा प्रश्न कायम होता. सरपंचांनी पुढाकार घेत, नालीचे पाणी अंगणातच जिरवण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे खड्डे करून दिले. त्यामुळे मुख्य चौकातील नालीचा प्रश्न मिटला. कुरणखेड गावात वाढती कोरोनाची संख्या बघता, गावात संसर्ग होऊ नये, याच दृष्टिकोनातून आणि गावातील संपूर्ण नागरिकांनी आपला प्रश्न ग्रामपंचायतीसमोर मांडावेत, म्हणून गुरुवारी ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक धाडसे, सरपंच प्रगती नवनीत पांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांडे, अमन महल्ले यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ऑनलाइन ग्रामसभेला उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी कुरणखेड ग्रामपंचायतीचे संगणक चालक मनोज बोळे उपस्थित होते.

फोटो: मेलमध्ये

कुरणखेड ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली. ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. अनेक कामांना मान्यता देण्यात आली. रमाई घरकुल आवास योजनेचा गरजू लाभार्थींना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- प्रगती नवनीत पांडे, सरपंच, ग्रामपंचायत, कुरणखेड

Web Title: Online Gram Sabha of Kurankhed Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.