‘ऑनलाइन’ खरेदी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:27 AM2017-10-11T01:27:01+5:302017-10-11T01:27:23+5:30

अकोला : विविध कंपन्यांनी ऑनलाइन महासेलमध्ये थेट ग्राहकांना सवलती दिल्याने आता ग्राहक ऑनलाईन खरेदीकडेही  वळला आहे. अकोलासारख्या सेंटरवरून दररोज लाखो रुपयांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदीेचा टक्का वाढल्याची नोंद कुरिअर संचालकांच्या व्यवहारामुळे होत आहे.

'Online' purchase increased! | ‘ऑनलाइन’ खरेदी वाढली!

‘ऑनलाइन’ खरेदी वाढली!

googlenewsNext
ठळक मुद्देअकोल्यातूनही होतेय दररोज लक्षावधींची खरेदी१५ कुरिअर कंपनी अकोल्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विविध कंपन्यांनी ऑनलाइन महासेलमध्ये थेट ग्राहकांना सवलती दिल्याने आता ग्राहक ऑनलाईन खरेदीकडेही  वळला आहे. अकोलासारख्या सेंटरवरून दररोज लाखो रुपयांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदीेचा टक्का वाढल्याची नोंद कुरिअर संचालकांच्या व्यवहारामुळे होत आहे.
गेल्या आठवडयात ऑनलाईन खेरदीसाठी कंपन्यांनी  महासेल चालवले. यामध्ये  मोबाइल आणि एक्सेसरीजमध्ये विविध नामांकित कंपन्यांनी थेट ५0 टक्क्यांपर्यंत सवलती दिल्यात. सोबतच फॅशन आणि ब्युटी संबंधित साहित्यावर तर ७0 टक्के सवलत दिल्या गेल्याने ग्राहक वर्ग मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन खरेदीकडे वळला आहे. अकोल्याच्या मुख्य बाजारपेठेत नामांकित कंपनीचे शो रूम थाटून बसलेल्या दुकानदारांकडेही खरेदीसाठी येणारा ग्राहक आता ऑनलाईनवर ही किंमत आहे, त्यापेक्षा स्वस्त आपण देऊ शकता का, असा प्रश्न ग्राहकाकडून केला जात आहे.  नामांकित कंपनीच्या डिलरने याबाबतची माहितीदेखील कळविली आहे. त्यामुळे महासेलपेक्षा अधिकची मार्जिन भविष्यात शो रूम संचालकांना मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खरेदीत मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, एलईडी टीव्ही, होम थियेटर, गृहसजावटीच्या वस्तू, लेडीज, जेन्टस, लहान मुलांचे रेडिमेड कपडे आदी खरेदीसाठी ग्राहक वळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या आवडी-निवडी सोबतच वस्तूंच्या किमतीत फसवणूक होण्याची भीती यामध्ये नसल्याने ऑनलाइन खरेदीचा कल वाढत जात आहे. त्यामुळे भविष्यात मॉलमधील गुंतवणूकही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

१५ कुरिअर कंपनी अकोल्यात
*कुरिअरच्या १५ नामांकित कंपनीचे कार्यालय अकोल्यात असून, त्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जात आहे. देशातील कानाकोपर्‍यातून आणि विदेशातून वस्तू विमानमार्गे नागपूर कार्यालयात येतात आणि तेथून अकोल्यात ही सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे ऑनलाइन सेवेमुळे अनेक युवकांना काम मिळाले आहे. सोबतच ऑनलाइन खरेदीमुळे अकोल्यातील नेट बँकिंग व्यवहारात वाढ झाली आहे.

युवा वर्गाचा कल अधिक
ऑनलाइन खरेदी करणार्‍यांमध्ये युवक-युवतींचे प्रमाण अधिक आहे. संगणक साक्षर असलेले आणि नेट बॅकिंगचे व्यवहार समजणार्‍या प्रौढांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. त्यामुळे युवा वर्गासाठी लागणार्‍या वस्तूदेखील ऑनलाइन जास्त आहेत.

Web Title: 'Online' purchase increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.