भारत विद्यालयात ऑनलाइन संस्कार शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:54+5:302021-05-16T04:17:54+5:30
शिबिरादरम्यान विविध जिल्ह्यांतून तसेच वेगळ्या राज्यातून आरोग्य, योगा, अभिनय, ग्रामगीता अध्ययन, सुगम गायन, शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, पाककला, हस्तकला, ...
शिबिरादरम्यान विविध जिल्ह्यांतून तसेच वेगळ्या राज्यातून आरोग्य, योगा, अभिनय, ग्रामगीता अध्ययन, सुगम गायन, शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, पाककला, हस्तकला, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. या ऑनलाइन संस्कार शिबिराचे संयोजक शिक्षक नीलेश ढाकरे व सुप्रिया यानपल्लेवार होते. शिबिराला मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीपान जगदाळे राज्य शिक्षण मंडळ, मुंबई, डॉ.रमेश थोरात, स्वामी रामशंकरजी, बैजनाथ हिमाचल प्रदेश, अमोल बांबल, गुरुकुंज आश्रम मोझरी, श्याम कोल्हाळे मूर्तिजापूर, जितेंद्र डहाके अकोला, उमेश आजनकर कारंजा वाशिम, डॉ. वृशाली संघई अकोला, दीप्ती चिद्दरवार अकोला, अश्विनी वारकरी तेल्हारा हे होते. १ ते १० मे २०२१ या कालावधीमध्ये झालेल्या शिबिरादरम्यान चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा, हस्तकौशल्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनीषा अभ्यंकर होत्या. प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाटील बाकरे, पर्यवेक्षक संजय घोगरे होते. सूत्रसंचालन नंदिनी निलखन, दीपप्रज्वलन, प्रार्थना धनश्री राऊत, स्वागतगीत फाल्गुनी भगत, देशभक्तीपर गीत सेजल गोमासे, आभार प्रदर्शन प्रथमेश मुदगल याने केले.
फोटो: