आरडीजी महाविद्यालयात ऑनलाइन सेमिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:32+5:302021-06-24T04:14:32+5:30
वाणिज्य विभाग गुरू अंगददेव टीचिंग लर्निंग सेंटर दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे २२ जून रोजी ...
वाणिज्य विभाग गुरू अंगददेव टीचिंग लर्निंग सेंटर दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे २२ जून रोजी उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रभारी कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डाॅ. विलास भाले यांनी केले. यावेळी भारतीय सेवासदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयंका, डाॅ. विमल रार, संयोजक जी. एल. डी., टी. एल. सी, प्राचार्य डाॅ. देवेंद्र व्यास, उपप्राचार्य डाॅ. अंबादास पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. विमल रार, संयोजक जी. एल .डी., टी.एल.सी, यांनी रिफ्रेशर कोर्सच्या माध्यमातून तांत्रिक क्षेत्रात शिक्षकांच्या समोर येणाऱ्या अडचणींना कशा प्रकारे सामोरे जाता येईल? तसेच उच्चशिक्षणात तंत्राच्या साहाय्याने सुलभता येऊ शकते. याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते प्रा. डाॅ. अशोक बक्षी, कुलगुरू, पीडीएम विद्यापीठ हरियाणा यांनी २१ व्या शतकात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांनी कशाप्रकारे कौशल्य आणि नैपुण्य प्राप्त करावे याबद्दल मार्गदर्शन केले. ऑनलाइन रिफ्रेशर कोर्सला संपूर्ण भारतातून २६० पेक्षा जास्त शिक्षकांनी व संशोधकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक प्रा. डाॅ. रूपा गुप्ता यांनी केले. आभारप्रदर्शन डाॅ. अंबादास पांडे यांनी केले.
फोटो: