पहिली ते आठवी शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:51 PM2018-09-17T13:51:56+5:302018-09-17T13:55:21+5:30
अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली.
अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. त्यासंबधी शिक्षकांचे आॅनलाइन प्रशिक्षण विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून २४ सप्टेंबरपासून हे शैक्षणिक वाहिनीद्वारे आॅनलाइन प्रशिक्षण होणार आहे.
डिजिटल शाळांच्या माध्यमातून शाळेमध्येच शिक्षकाला हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय या प्रशिक्षणाचे प्रक्षेपण टीव्हीच्या मोबाइल अॅपमध्येदेखील पाहता येणार आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाच्या अखेरीस प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण अभिप्राय नोंदवावा लागणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक विषय प्रक्षेपणाचा कालावधी एक तासाचा राहील. प्रशिक्षणासाठी शाळांनी दूरदर्शन व ‘डीटीएच’ची सुविधा, मोबाइल स्क्रीन प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध करावी, ध्वनिक्षेपकाचीसुद्धा व्यवस्था करावी, प्रत्येक केंद्रामध्ये हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
प्रशिक्षणाचे वेळापत्रक
२४ सप्टेंबर रोजी सकाळी १0.३0 ते ११.३0 दरम्यान मराठी बालभारती, ११.४५ ते १२.४५ दरम्यान मराठी सुलभभारती, १ ते २ वाजतापर्यंत मराठी सुगमभारती, २.१५ ते ३.१५ पर्यंत हिंदी बालभारती, ३.३0 ते ४.३0 पर्यंत हिंदी सुलभभारती, ४.४५ ते ५.४५ पर्यंत हिंदी सुगमभारती, २५ सप्टेंबर रोजी इंग्रजी (माय इंग्लिश बुक), इंग्रजी (बालभारती), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, २६ सप्टेंबर रोजी गणित (उर्दू), विज्ञान (उर्दू), इतिहास, भूगोल, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण, उर्दू, २७ सप्टेंबर रोजी मराठी (बालभारती), गणित, इंग्रजी (माय इंग्लिश बुक), इंग्रजी, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण आणि २८ सप्टेंबर रोजी उर्दू, गणित, हिंदी प्रथम, गुजराती प्रथम (पहिली), गुजराती प्रथम (आठवी) आदी विषयांचे प्रशिक्षण वेळापत्रकानुसार होणार आहे.