ग्राम कृषी संजिवणी समितीच्या सदस्यांना ‘आॅनलाईन’ प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:05 PM2019-02-08T15:05:34+5:302019-02-08T15:06:09+5:30
वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा राज्यातील १५ जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २९ आणि दुसºया टप्प्यात ८१ गावांची निवड करण्यात आलेली आहे. दुसºया टप्प्यात निवडण्यात आलेल्या गावांतील ग्राम कृषी संजिवनी समितीच्या सदस्यांना प्रकल्पाची तोंडओळख व्हावी, समितीचे कर्तव्य व जबाबदाºयांची माहिती व्हावी यासाठी महाराष्टÑातील सर्व समित्यांसाठी एकाच दिवशी लाईव्ह आॅनलाईन प्रशिक्षण प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईच्यावतीने देण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १८ ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आले. वाशिम तालुक्यातील साखरा, खरोळा, गोंडगाव, चिखली खु., मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, जउळका, रिसोड तालुक्यातील एकलासपूर, रिसोड, मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी, गिंभा, मानोरा तालुक्यातील दापूरा, मानोरा तीन सभागृह, कारंजा तालुक्यातील कामरगाव, कारंजातील ३ सभागृहात असे एकूण १८ ठिकाणी हे प्रशिक्षण झाले.
कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती सदस्यांना प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रकल्पाची पार्श्वभुमी व उद्देश तसेच समिती सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे व पुढील कामाची दिशा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासाचंद्र रस्तोगी यांनी माहिती दिली. प्रकल्प विशेष कृषी व्यवसाय रफीक नाईकवाडी यांनी ग्राम कृषी संजीवनी समितीची रचना व जबाबदाºया व अनुषंगिक माहिती दिली. कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, कृषी अभियंता गणेश मांढरे, वित्त विशेषतज्ञ तुळशिदास सोळंके आदींनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईच्या कविता तागडे यांनी केले.
सदरील प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रकल्प कक्षाचे मिलींद अरगडे, विवेक मानकर, प्रमोद बोबडे, राजेश कोकाटे, अनिल कंकाळ यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींनी परिश्रम घेतले.