१0 हजार लोकांमागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:03 AM2020-07-31T10:03:08+5:302020-07-31T10:03:28+5:30
आताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या १० हजार नागरिकांच्या मागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा देवदूतासारखी कार्य करत आहे; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा मागोवा घेतला असता आताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या १० हजार नागरिकांच्या मागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून आरोग्य विभागात ३ हजार ५२७ अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कार्यरत असून ५२८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाच्या संकटाच्या काळात या आरोग्य कर्मचाºयांवर जिल्ह्याचा डोलारा सध्या उभा आहे; मात्र सध्या प्राप्त परिस्थितीत प्रसंगानुरूप आरोग्य यंत्रणा परिस्थिती हाताळत असून, कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी झटत आहे. सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाची कमी आहे त्या कर्मचाºयांवरील ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर जागा भरण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही कंत्राटी तत्त्वावरील पदे एकास चार या प्रमाणे भरली जाणार आहेत. म्हणजेच चार रुग्णांसाठी एक पद भरले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये परिचारिका, कोविड वॉर्डासाठी फार्मासिस्ट, डाटा एंट्री आॅपरेटर, आयुष डॉक्टर आदी पदांचा समावेश असणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागात गत १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात तत्त्वावर पदभरती करण्यात आली होती. त्यानुसार ४१ परिचारिका आणि २३ वर्ग चारचे कर्मचारी नियुक्तीनंतर रुजूही झालेत; मात्र कोरोनाच्या धसक्यामुळे यातील काही कर्मचारी पुन्हा आलेच नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोरोना उपाययोजनांवर ३.४१ कोटींचा खर्च!
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ३० जुलैपर्यंत विविध उपाययोजनांवर ३ कोटी ४१ लाख ४७ हजार ८६२ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
अकोला महापालिकेने तब्बल ६६ लाखांचा खर्च आतापर्यंत केला आहे; मात्र पालिकेला शासनाकडून ४0 लाख मिळलो.
सर्वोपचारवर ताण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयावर कोरोनाचा सर्वाधिक ताण आहे. कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ उडत आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवर सगळ््यांचे लक्ष लागले आहे.
लढाई कोरोनाशी!
मनुष्यबळ कमी असले तरी आरोग्य विभागा योद्धाप्रमाणे कोरोनाच्या लढाईत उतरला आहे. अकोला मनपा क्षेत्रात आरोग्य विभागाच्या कर्मचाºर्यांचे परीश्रम व नागरिकांचे सहकार्य तसेच मनपा आयुक्त व सर्वांचे मार्गदर्शन यामुळे शहरातील कोरोना संसर्गावर बºयापैकी नियंत्रण मिळविले आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे अपुºया मनुष्यबळाला नागरिकांची साथ हवी.
- डॉ. फारुख शेख,
वैद्यकीय अधिकारी, मनपा
पदभरतीला सुरुवात!
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर निश्चितच ताण येत आहे. त्यामुळे कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात आली असून, त्या माध्यमातून रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा तसेच रुग्णालय परिसरात भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक,
अकोला