पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:26 AM2021-07-20T10:26:26+5:302021-07-20T10:26:55+5:30

Only 20% of students apply for Polytechnic : १५ दिवसांपासून पॉलिटेक्निक कॉलेजद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Only 20% of students apply for Polytechnic | पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज!

पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज!

Next
ref='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. कोणते करिअर निवडायचे याबाबतही संभ्रम आहे. पॉलिटेक्निकचे तंत्रही बिघडणार असल्याचे चित्र यंदा दिसून येत आहे. १५ दिवसांपासून पॉलिटेक्निक कॉलेजद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ २० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश अर्ज केले आहेत. एकेकाळी पॉलिटेक्निकला मोठी मागणी होती. चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. परंतु, अलीकडच्या काळात अभियांत्रिकी विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील शेकडो जागा दरवर्षी रिक्त राहत आहेत. यंदाही तीच परिस्थिती राहण्याची शक्यता दिसून येत आहे. कोराेनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शासनाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता बारावीचा सुद्धा त्याच आधारे निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना थेट इंजिनिअरिंग, मेडिकलला पसंती दिल्यामुळे पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहण्याची भीती आहे. तसेच पॉलिटेक्निकऐवजी आयटीआयला विद्यार्थी पसंती देत असल्यामुळेही पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहत आहेत. आता नुकताच दहावीचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांनी प्रवेेश अर्जाची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - ०२एकूण प्रवेश क्षमता - ५४० आतापर्यंत केलेले अर्ज - ३२३अर्ज भरण्याची अखेरची मुदत- २३ जुलै दहावी निकालानंतर येणार गती पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू करण्यात आली. परंतु, इयत्ता दहावीचा निकाल लागायचा असल्याने, बैठक क्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज कमी झाले. आता १६ जुलै रोजी दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाला गती मिळण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालानंतर मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थी करिअर निवडतात. त्यामुळे टक्केवारीनुसार विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळतात. त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशाला काही दिवसांत गती येण्याची शक्यता आहे. २३ जुलै ही ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्तयंदा दहावीची परीक्षा रद्द झाली. निकालही उशिरा लागला. दहावीचा निकाल न लागताच तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली. प्रवेश अर्ज करताना, विद्यार्थ्यांना मार्कशिट, बैठक क्रमांक द्यावा लागतो. परंतु निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेश अर्जच केले नाहीत. गतवर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्ज केले होते. तरीही १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश अर्ज प्रक्रियेला गती मिळणार आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. यंदाही पॉलिटेक्निक कॉलेजमधील सर्व जागा भरण्याची अपेक्षा आहे. २३ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने, विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेशासाठी अर्ज करावेत. -डॉ. अरुण गुल्हाने, प्राचार्यशासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर दहावीचा निकाल लागायचा होता. गुणपत्रिका, टक्केवारी माहिती नसल्याशिवाय अर्ज कसा करावा. शिवाय बैठक क्रमांकही नव्हता. त्यामुळे पॉलिटेक्निकच काय, अन्य ठिकाणी प्रवेश घेण्याचा प्रश्नच नव्हता. आता दहावीचा निकाल लागला आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे असल्याने, त्यादृष्टीने पुढील प्रवेश घेणार आहे. -प्रियांशु लक्ष्मण शिरसाट, विद्यार्थीदहावीचा निकाल लागल्याशिवाय पुढील दिशा ठरविता येत नव्हती. निकाल, गुणपत्रिकेशिवाय कोणत्या क्षेत्राकडे जायचे हे ठरविले नव्हते. आता निकाल लागला आहे. गुणही चांगले मिळाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र निवडण्याचे ठरविले आहे.-ईशा नारायण पवार, विद्यार्थिनी

Web Title: Only 20% of students apply for Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.