दिवाळीनंतरच कर्जमाफीचा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:51 AM2017-09-30T00:51:21+5:302017-09-30T00:51:30+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी संपता संपत नाहीत. कर्जमाफीचा शेतकर्यांना दसर्याच्या आधी लाभ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने संपूर्ण विदर्भात आंदोलन केले, तर कर्जमाफीचा लाभ हा दिवाळीपूर्वी देऊ, असे भाजपाने जाहीर केले. मात्र, या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेला मुहरूत टळला आहे, त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची भर पडल्याने दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता मावळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकर्यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फ त ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्धतेपासून, तर कनेक्टिव्हिटीपर्यंतच्या अडचणी उभ्या ठाकल्या. मशीन उपलब्ध झाल्यानंतर आधार कार्ड नोंदणीच्या वेळी घेण्यात आलेल्या अनेक शेतकर्यांच्या बोटांच्या ठशांचे ‘मॅचिंग’ ऑनलाइन अर्ज अपलोड करताना झाले नाही. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी शेतकर्यांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा आधार केंद्रावर लागल्या. हा सर्व गोंधळ निस्तारण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिल्याने प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे सरकली होती व आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीसाठी शेतकर्यांनी भरलेल्या अर्जांचे चावडी वाचन थांबविण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी ही दिवाळीनं तरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यां पासून सुरू असलेले कर्जमाफीचे गुर्हाळ हे आणखी दोन महिने लांबण्याची शक्यता आहे.