नामनिर्देशन पत्र दाखल करताना केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश! जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा आदेश

By रवी दामोदर | Published: March 18, 2024 05:36 PM2024-03-18T17:36:39+5:302024-03-18T17:37:21+5:30

जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केले आहे.

only five persons are allowed to file nomination papers order of district election officers in akola | नामनिर्देशन पत्र दाखल करताना केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश! जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा आदेश

नामनिर्देशन पत्र दाखल करताना केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश! जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा आदेश

रवी दामोदर,  अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. यासंदर्भात जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केले आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात, तसेच दालनात केवळ पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच  वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा अधिक वाहने असू नयेत. कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्ये वाजविणे, गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

वाहतुकीला अडथळा नको -

निवडणूकीचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊटस्, होर्डिंग्ज आदी साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा किंवा अपघात होईल असे लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रके लावणे, घोषणा लिहिणे यासाठी कोणतीही खासगी जागा, इमारत, आवार, भिंतीचा वापर करण्याबाबत संबंधित जागामालक व संबंधित परवाना प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

ध्वनीक्षेपक वापराबाबत मर्यादा -

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वा. वाजण्यापूर्वी व रात्री १० वा. नंतर वाहनावर किंवा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. प्रचार वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह वाहन फिरते ठेवण्यास प्रतिबंध आहे.

Web Title: only five persons are allowed to file nomination papers order of district election officers in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.