अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:23 PM2018-10-12T13:23:55+5:302018-10-12T13:24:25+5:30

अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे.

Only five schools of Akola Municipal Corporation will start Anganwadi! | अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी!

अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी!

Next

- आशिष गावंडे
अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे. बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर महापालिकेच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार आहे. यामुळे मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बालवाडीचे वर्ग सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही, तोच एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी बालवाडी व त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या शहरातील अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपाने शहरातील १७९ अंगणवाड्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यास मनपाचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देश सफल होण्यास मदत होणार असल्याचे सुचवित एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बालवाडीचे वर्ग बंद करून अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. या प्रस्तावाला मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळविली होती, हे येथे उल्लेखनीय.

 

Web Title: Only five schools of Akola Municipal Corporation will start Anganwadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.