दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:20 PM2024-05-27T14:20:33+5:302024-05-27T14:20:46+5:30
दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़
राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला: यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकाेला जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९७.४८ निकाल लागला आहे तर मुलांचा निकाल ९५.१७ टक्के आहे.यामध्ये ९,३३२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.
दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़ त्यापैकी २४,२१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामध्ये ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या असून, १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी १२ हजार ४१६ मुले आणि ११ हजार ७८३ मुलींनी परीक्षा दिली होती. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी आपला निकाल बघितल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच आनंद,जल्लोष केला.