शौचालय असेल तरच धान्य मिळणार!

By admin | Published: October 3, 2016 02:40 AM2016-10-03T02:40:25+5:302016-10-03T02:40:25+5:30

अकोला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले ग्रामपंचायतला आदेश.

Only if there is toilets will get grain! | शौचालय असेल तरच धान्य मिळणार!

शौचालय असेल तरच धान्य मिळणार!

Next

बोरगाव वैराळे(जि. अकोला), दि. २- स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक आगळी वेगळी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आ ता ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना यापुढे स्वस्त धान्य मिळणार नाही. यासंबधीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.या आदेशाचे वाचन बोरगाव वैराळे येथील ग्रामसभेत करण्यात आले.
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त बोरगाव वैराळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत ग्रामसवेक गजानन लांडे यांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश वाचून दाखवला. त्या आदेशात ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना धान्य देउ नये, असे म्हटले आहे. त्यामुळे, शौचालय नसणार्‍या ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत. ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी शासन खेड्यातील लोकांना प्रोत्साहनपर साडेबारा हजार रुपये अनुदान देत असले तरीही अनेक ग्रामस्थ शौचालय घरात बांधण्यासाठी उदासीन असून, उघड्यावर शौचाला जातात. उघड्यावर शौचाला जाणे बंद व्हावे, यासाठी अकोला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अभिनव संकल्पना हाती घेतली असून, यापुढे उघड्यावर शौचाला जाणार्‍या लोकांना धान्य वाटप स्वस्त धान्य दुकानातून करू नये, असे आदेश बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला दिले आहेत. या आदेशाची प्रत येथील ग्रामसेवक गजानन लांडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार विकास कोकाटे यांना दिली असून, त्यांनी गावात दवंडी पिटवून उद्यापासून शौचालय नसणार्‍या लोकांना व शौचालय असून, त्याचा वापर न करणार्‍या लोकांना धान्य वाटप मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, गावात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अभिनव संकल्पनेचे विनायकराव वैराळे यांनी स्वागत केले.

Web Title: Only if there is toilets will get grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.