पदाेन्नतीच्या प्रक्रियेनंतरच बदल्या करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:15+5:302021-04-08T04:19:15+5:30
अकाेला प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया होत असतांना सहायक शिक्षक, विषय शिक्षक व ...
अकाेला प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया होत असतांना सहायक शिक्षक, विषय शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक या संवर्गातील कार्यरत शिक्षकांचे संवर्गनिहाय अचूक मॅपिंग तसेच पदोन्नती प्रक्रिया राबवूनच बदल्या कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली.
निवेदनात नमुद केले आहे की सन २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षीसुध्दा विषय शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची मिळून शंभर पेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत. त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात सहायक शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे बदल्यांसाठी मॅपिंग करत असताना सहायक शिक्षकांची पदे अतिरिक्त दिसतात याचा सरळ फटका आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना बसत असून त्यांचा स्वजिल्ह्यात येण्याचा मार्ग बंद होत आहे. सार्वत्रिक बदल्यांची सुरुवात होण्याआधी जिल्ह्यातील विषय शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह वंदना बोर्डे,गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन,दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर,सचिन काठोळे, श्याम कुलट, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे,नितिन बंडावार,सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, चंद्रशेखर पेठे आदी उपस्थित हाेते