निसर्गाचा एकच संदेश, घराघरात शाडू मातीचा श्रीगणेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:04+5:302021-09-11T04:20:04+5:30
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे नदी, तलावांमध्ये जलप्रदूषण वाढीस लागले आहे. ही बाब ध्यानात घेऊन काैलखेडस्थित शिवशक्ती प्रतिष्ठान येथे ...
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे नदी, तलावांमध्ये जलप्रदूषण वाढीस लागले आहे. ही बाब ध्यानात घेऊन काैलखेडस्थित शिवशक्ती प्रतिष्ठान येथे निसर्गाच्या सानिध्यात प्राध्यापक शरद कोकाटे, प्रमाेद बगळेकर यांच्या मार्गदर्शनात शाडू मातीद्वारे गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयाेजित करण्यात आली हाेती. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पारितोषिक वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एलसीबी प्रमुख संतोष महल्ले, खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीरंग सनस, प्रा. पल्लवी कुलकर्णी, प्रा. राजपूत सर, बाळा तायडे सर यांच्याहस्ते करण्यात आले. प्रथम पारितोषिक कु. प्रांजली मोहन ढोरे, द्वितीय महेश शिंदे व तृतीय पारितोषिक आर्ट ग्रुप अकोला यांना देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी पंकज गावंडे मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.