तेल्हारा तालुक्यात केवळ एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:14 AM2021-07-10T04:14:23+5:302021-07-10T04:14:23+5:30
-------------------------------- अकोट तालुक्यात केवळ एक पॉझिटिव्ह अकोट: तालुक्यातील कोरोनाचा आलेख घसरला असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, ...
--------------------------------
अकोट तालुक्यात केवळ एक पॉझिटिव्ह
अकोट: तालुक्यातील कोरोनाचा आलेख घसरला असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यात केवळ एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-----------------------------
अकोला शहरात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
अकोला: मनपा क्षेत्रात रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा आलेख घसरला असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन होत आहे; मात्र दुसरीकडे शहरातील बाजारपेठमध्ये गर्दी होत असल्याने धोका वाढला आहे.
-----------------------------
अकोट तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव
अकोट : तालुक्यात सध्या पेरणीची लगबग सुरू असून, शेतशिवारात आता कोवळी पिके डोलू लागली आहेत; परंतु वन्य प्राणी ही कोवळी पिके फस्त करीत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
-------------------------
डवरणीच्या कामाला येणार वेग!
अकोला: पावसाने हजेरी लावल्याने डवरणीचे काम सुरू झाले आहे. तसेच रखडलेल्या पेरणीची कामे पुन्हा सुरू होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.
-------------------------------
अकोला तालुक्यात खंडित वीजपुरवठा
अकोला: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक मात्र कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज वितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
------------------------------
उघड्यावरील खाद्यपदार्थ जीवघेणे
अकोला: शहरात ठिकठिकाणी उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी पदार्थ कधीही झाकून ठेवले जात नाहीत. तशीच त्या पदार्थाची विक्री करण्यात येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
---------------------------
मोबाइलचे नेटवर्क गायब; नागरिक त्रस्त
पातूर: तालुक्यात मोबाइल नेटवर्क गायब असल्याने ग्राहकांचा एकमेकांशी संपर्क तुटल्याचे चित्र आहे. रविवारी सकाळपासून नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मोबाईल कंपन्यांनी सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------------
अवाजवी वीज देयकांमुळे ग्राहक त्रस्त
तेल्हारा: लॉकडाऊन उठताच, एकाचवेळी तीन महिन्याची अवाढव्य देयके आल्याने शेती हंगामाच्या तोंडावर ही बिले कशी भरावीत, असा प्रश्न आहे. अवाजवी देयकांमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे कोरोना काळातील बिल माफ झाले नाही.