एकमेव आधार काेराेनाने नेला, या पालकांना काेण मदत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:14 AM2021-06-06T04:14:43+5:302021-06-06T04:14:43+5:30

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार? अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना ...

The only support taken by Kareena, who will help these parents? | एकमेव आधार काेराेनाने नेला, या पालकांना काेण मदत करणार?

एकमेव आधार काेराेनाने नेला, या पालकांना काेण मदत करणार?

Next

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार?

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु एकच अपत्य असलेल्या व वयाचीही पन्नाशी ओलांडणाऱ्या पालकांचा आधारच काेराेनाने नेला असेल तर त्यांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. अनेक घरांमधील कर्त्यापुरुषांना काेराेनाने जिवास मुकावे लागले अशा घरांमधील ज्येष्ठांच्या समाेर आता माेठा प्रश्न उभा राहू शकताे. त्यामुळे अशा संकटाला सामाेर जाणाऱ्या ज्येष्ठांनाही सरकारने मदत करण्याची गरज आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालकांचे छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांनी वडिलांचे व २९ बालकांनी आईचे छत्र हरवले. त्यापैकी २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. ही बाब अतिशय सकरात्मक असली तरी ज्यांच्या घरातील आधारच गेला अशा ज्येष्ठांसाठी तसेच कर्ता पुरुष गमावलेल्या महिलांसाठी सरकारने मदतीचा हात देण्याची गरज आहे. काेराेनामुळे लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी १३ ते २५ वर्षीय वयाेगटातील अनेक मुला-मुलींचा मृत्यू झाल्याची नाेंद आराेग्य विभागाच्या दप्तरी आहे. यामध्ये काही मुले अशीही आहेत जे आपल्या पालकांचे एकमेव अपत्य हाेते. यांच्या भरवशावर यांचे म्हातारपणातील भवितव्य अवलंबून हाेते. आता तेही गेल्याने या पालकांनी काय करावे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :

बरे झालेले रुग्ण :

सध्या उपचार सुरू असलेले :

एकूण मृत्यू :

ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच

एक अपत्य असलेल्या ५० ते ५५ वर्षांवरील पालकांनाही मदत जाहीर करण्याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने ज्येष्ठ व्यक्तीचे पालनपाेषण पुढे काेणी करावे, हा माेठा प्रश्न आहे.

----------------------------

अशा पालकांना दरमहा अर्थसाह्याची गरज

कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकच अपत्य असलेल्या पालकांनाही दरमहा अर्थसाह्याचे नियाेजन करण्याची गरज आहे.

Web Title: The only support taken by Kareena, who will help these parents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.