घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

By Admin | Published: April 25, 2016 02:04 AM2016-04-25T02:04:59+5:302016-04-25T02:04:59+5:30

रामदास आठवले यांचा इशारा.

Only those who change the language of change will be able to change it | घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

googlenewsNext

बुलडाणा: केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभर कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बाबासाहेबांचे पाईक आहेत. ते आरएसएसचे ऐकत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा विश्‍वास असून, ते घटनेप्रमाणे देश चालवित आहेत. तरीही घटना बदलविण्याची कोणी भाषा केल्यास आम्ही त्यालाच बदलवून टाकू, असा इशारा खा. रामदास आठवले यांनी दिला.
जाती तोडो, भारत जोडो, समता अभियानाअंतर्गत खासदार आठवले यांनी काढलेली भारत भीम यात्रा रविवारी दुपारी बुलडाणा येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. इंदू मिलच्या जागेवर होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक, महु येथील बाबासाहेबांचे निवासस्थान, याशिवाय बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या इतर स्थळांचा विकास करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण सुध्दा हे सरकार काढू शकत नाही. सरकारसंदर्भात वावड्या उठविल्या जात आहेत, त्यावर विश्‍वास ठेवू नका. जर कुणी संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्याला सर्वप्रथम आर.पी. आय. रस्त्यावर उतरुन विरोध करेल, कारण आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. सरकारची प्रत्येक भूमिका आम्हाला मान्य असेलच असे नाही. आमचे स्वतंत्र अस्तीत्व आहे.
पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश कार्यध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, युथ रिपब्लीकनचे अध्यक्ष विजय साबळे, केशव सरकटे, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई उपस्थित होते.

विदर्भ राज्य व्हावे ही भाजपची भूमिका !
विदर्भ राज्य वेगळे व्हावे, ही भाजपची सुरूवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला आरपीआयचासुध्दा पाठींबा आहे. कारण भाषावार प्रांतरचनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संमती होती. त्यामुळे वेगळा विदर्भ होईल असा विश्‍वास वाटतो. विदर्भ व मराठवाड्यावर कॉंग्रेसनेच अन्याय केला. विदर्भाच्या विकासाचे खरे मारक काँग्रेसवालेच आहेत, विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प अद्याप पुर्णत्वास गेला नाही. चंद्रपूर, गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतचे अनेक प्रकल्प व विकासाच्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे प्रश्न मार्गी लागले असते तर आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न पुढे आलाच नसता. आता शिवसेना सोडली तर, सर्वच राजकिय पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत.

प्रकाश आंबेडकरांनाच नकोय ऐक्य !
रिपाइंचे ऐक्य व्हावे ही प्रामाणिक भूमिका माझी नेहमीच राहीली आहे. एवढेच काय प्रकाश आंबेडकरांनीच या ऐक्याचे श्रेय घेऊन त्यांनीच प्रमुख बनावे, असेही मी वेळोवेळी बोललो आहे. मात्र मी ऐक्यासाठी बैठक बोलाविली की, प्रकाश आंबेडकर गैरहजर राहतात, अशी खंत खा. आठवले यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आपणास का टाळतात? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा मी ऐक्याची भूमिका घेतो, तेव्हा त्यांना असे वाटते की, शरद पवारांनीच आठवलेंना पुढे केले काय, त्यामुळे ते चर्चेत सहभागी होत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी १९९0 मध्ये ऐक्य कसे तुटले याचा किस्साही सांगीतला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

Web Title: Only those who change the language of change will be able to change it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.