अवघे विघ्ने नेसी विलया..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:26 AM2017-09-06T01:26:34+5:302017-09-06T01:26:57+5:30
लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे आहे. घराघरांत आनंद आणि प्रसन्नता आणणार्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे मन धीरगंभीर झाले होते. आपल्या लाडक्या गणरायाने सर्वांंचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी.. लाडक्या बा प्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रथम मानाच्या बाराभाई गणपतीची महाआरती झाल्यानंतर सुरुवात झाली. शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे आहे. घराघरांत आनंद आणि प्रसन्नता आणणार्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे मन धीरगंभीर झाले होते. आपल्या लाडक्या गणरायाने सर्वांंचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी.. लाडक्या बा प्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रथम मानाच्या बाराभाई गणपतीची महाआरती झाल्यानंतर सुरुवात झाली. शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी गणेश घाटावर सात कुंड सज्ज ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेश घाट, निमवाडी घाट, अनिकटवर गणशे विसर्जनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी तर भाविकांनी अनिकट, निमवाडी व गणेश घाटावर प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी रात्री १२.३0 वाजेपर्यंंत अविरत कायम होती. महापालिकेने याठिकाणी भाविकांच्या स्वाग तासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. निर्माल्य टाकण्यासाठी मनपाने स्वच्छता रथांची व्यवस्था गणेश घाटावर केली होती. मंगळवारी शहरातील गणेश घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोड, निमवाडी घाटावर गणेशभक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
गणपती बाप्पा चिमुकल्यांचे लाडके दैवत. बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंबीयासोबत, आई-वडिलांसोबत बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली होती. चिमुकली मुले गणेश मूर्तीला हातात, डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी या तिन्ही घाटावर आणत होते. सुरुवातीला गणेशाची आरती, विधिवत पूजन करून विसर्जन केले जात होते. गणेश घाटावरील गर्दीच्या तुलनेत निमवाडी घाटावर विसर्जन करणार्या नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. निमवाडी पुलावरूनही भाविक मोठय़ा संख्येने गणेश विसर्जन करीत होते.
आखाडा (अनिकट), वीर हनुमान व्यायाम शाळा (जुने शहर), जय भवानी रामभरोसे व्यायाम शाळोचा समावेश होता.
सायंकाळी वाढली गर्दी!
सकाळी ११ वाजता सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मिरवणुकीत केवळ २६ गणेश मंडळांचे गणपती सहभागी झाले होते. गणपती पाहण्यासाठी यंदा सकाळी मिरवणूक मार्गांंवर नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. मात्र, सायंकाळी ४ वाजतापासून नागरिकांनी गणपती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती.
रात्री १२.१५ वाजेनंतर झाला समारोप !
रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी लक्कडगंज येथील बाल गणेश मंडळाची मूर्ती मिरवणुकीत रवाना होणारी शेवटची मूर्ती होती. त्यानंतर ताजनापेठ पोलीस चौकींसमोर मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सी. वाकडे, जिल्हाधिकारी पाण्डेय व पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आदी उपस्थित होते. रात्री १२.१५ वाजेपर्यंंत ३७ गणेश मंडळांनी ताजनापेठ चौकातून गणेश घाटाकडे प्रस्थान केले होते. यानंतर अर्जुन समाज गणेश मंडळाची मिरवणूक रात्री १ वाजता सुरु झाली होती.
-