शिकाऊ डॉक्टरांवरच ‘ओपीडी’चा कारभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:00+5:302020-12-05T04:30:00+5:30
अपघात कक्ष सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण सर्वप्रथम अपघात कक्षात दाखल होते. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी संबंधित ...
अपघात कक्ष
सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण सर्वप्रथम अपघात कक्षात दाखल होते. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी संबंधित वाॅर्डात दाखल केले जाते. या ठिकाणी रुग्णांवर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनच उपचार केला जातो.
बाह्यरुग्ण विभाग
अपघात कक्षासोबतच बाह्यरुग्ण विभागातही सर्वाधिक डॉक्टर हे प्रशिक्षणार्थी आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णसेवेची मदार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरच येते.
मेडिसीन
सर्वोपचार रुग्णालयात सर्वाधिक गंभीर परिस्थिती मेडिसन विभागाची आहे. या विभागात नियमित डॉक्टरांची पदे रिक्त असून, मोजक्याच डॉक्टरांवर कारभार चालतो. त्यामुळे या विभागाचाही कारभार प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर चालत असून, रात्रीच्या वेळी परिस्थिती गंभीर होते.
अतिदक्षता कक्ष
अतिदक्षता कक्षात गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टरांची आवश्यकता आहे; मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे येथे एक किंवा दोन डॉक्टर सोडल्यास इतर डॉक्टर प्रशिक्षणार्थीच असल्याचे निदर्शनास आले.