उघड्यावर शौच; नागरिकांवर होणार फौजदारी कारवाई
By admin | Published: July 9, 2017 09:19 AM2017-07-09T09:19:28+5:302017-07-09T09:19:28+5:30
महापालिकेचा निर्णय; पथकांना दिल्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ह्यस्वच्छ भारतह्णअभियान अंतर्गत राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची पाहणी केली. वैयक्तिक शौचालयांची निर्मिती व उघड्यावर शौचास बसणार्यांचे अत्यल्प प्रमाण पाहता शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले. असे असताना मनपाच्या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम करून उघड्यावर शौचास बसणार्यांच्या विरोधात आता थेट फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
उघड्यावर शौच केल्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्य़ात साथरोगांचा झपाट्याने फैलाव होऊन त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना होतो. साथ रोगांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे महापालिकांना उद्दिष्ट दिले. मनपा प्रशासनाने या कामासाठी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह सुरक्षा रक्षकांची मदत घेतली. शहराच्या कानाकोपर्यात सर्व्हे करून लाभार्थींच्या शोध घेतला. त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये लाभार्थी हिस्सा जमा केला. लाभार्थी शौचालय बांधण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून प्रशासनाने शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली. नवीन प्रभागांसहित मनपा क्षेत्रात १८ हजारपेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आली. घरी शौचालय बांधल्यावरही काही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचा प्रकार लोकमत चमूच्या पाहणीत समोर आला. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उघड्यावर शौच करणार्या नागरिकांना पकडून त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची तक्रार करण्याचे निर्देश पथकांना दिले आहेत.