उघड्यावर शौचास जाणा-यांचा हार घालून सत्कार
By admin | Published: February 10, 2016 02:10 AM2016-02-10T02:10:40+5:302016-02-10T02:10:40+5:30
कारंजा पंचायत समितीची ‘गांधीगिरी’ .
कारंजा: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कारंजा तालुक्याची उघड्यावर शौचमुक्त मोहिमेसाठी निवड झाली असून, या मोहिमेंतर्गत तालुक्यातील ९१ गावे संपूर्ण हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट स्थानिक पंचायत समितीने ठेवले आहे. सकाळी शौचालय जाणार्यांना हार घालून सत्कार करीत या पथकाने गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. पथक दररोज तालुक्यातील विविध गावांना सकाळ व संध्याकाळी भेटी देत आहे. सोमवारी या पथकाने उघड्यावर शौचास जाणार्यांचे हार व पुष्प देऊन ह्यगांधीगिरीह्ण च्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कारंजा पंचायत समितीचे सभापती वर्षा नीतीन नेमाने, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, सहायक गटविकास अधिकारी एस.एच. पर्हाते, विस्तार अधिकारी साही चव्हाण आदींच्या नेतृत्वात ह्यगुडमॉनिर्ंगह्ण पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक दररोज तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणार्यांना मज्जाव करीत आहे. समज देऊनही उघड्यावर शौचास जाणार्यांना गुडमॉनिर्ंग पथकातर्फे पुष्पमाळा घालून सत्कार करण्यात येत आहे. या गांधीगिरीमुळे अनेकांनी उघड्यावर शौचास जाण्यास बंद केले आहे.