उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:32 AM2021-06-20T11:32:41+5:302021-06-20T11:32:49+5:30

Temples are closed : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत.

Open the door now God ... start the business; The temples are closed | उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

googlenewsNext

अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. आता निर्बंध शिथिल होत असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या गेटजवळच भाविक नतमस्तक होऊन दर्शन घेत आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार संसर्गाचा वृद्धीदर कमी असलेल्या जिल्ह्यात अकोल्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वराचे दर्शन करण्यासाठी भाविक येतात; परंतु मंदिर बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जातात. यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

 

किती दिवस कळसाचेच दर्शन?

कोरोनामुळे होणारी गर्दी पाहता सर्व मंदिरे बंद आहे. निर्बंध शिथिल झाल्याने भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराजवळ जाऊनही केवळ कळसाचेच दर्शन करून परतावे लागते.

- मंगेश ताठे, भाविक

 

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची दरवाजे केव्हा उघडणार अशी आस लागली आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने देवस्थाने उघडण्यात यावी, आणखी किती दिवस दूर दर्शन करावे लागणार आहे.

- अजय राऊत, भाविक

 

आर्थिक गणित कोलमडले !

शहरातील सर्व मंदिर बंद आहे. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही बंद असल्याने फुलाला मागणी नाही. आता निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहे; परंतु मंदिरे बंद असल्याने सर्व व्यवसाय बुडाला.

- मुकेश विटकर, फूलविक्रेता

मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे. मंदिर बंद असल्याने व्यवसाय केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- मोहन अंबारखाने, पूजा साहित्य विक्रेता

मंदिरात गेल्याने आत्मबळ मिळते !

निर्बंध हटल्यानंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जात आहे. मंदिर बंद असल्याने त्यांना दूर दर्शन करून परतावे लागते. भाविकांची श्रद्धा पाहता लवकरात लवकर मंदिर खुलणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पाळून सर्व उघडत असताना मंदिर सुद्धा उघडायला हवी, मनुष्याला मंदिरात गेल्याने आत्मबळ प्राप्त होते.

- पंडित रविकुमार शर्मा, पुजारी

Web Title: Open the door now God ... start the business; The temples are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.