पूर्णा, मन नदीपात्रातून खुलेआम रेतीची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:58+5:302021-03-06T04:17:58+5:30
बाळापूर तालुक्यातील हिंगणा, निंबा गावे बाळापूर व निंबा मंडळामध्ये येतात. हिंगणा येथील मन नदी पात्रामधून रेतीची अवैध वाहतूक ...
बाळापूर तालुक्यातील हिंगणा, निंबा गावे बाळापूर व निंबा मंडळामध्ये येतात. हिंगणा येथील मन नदी पात्रामधून रेतीची अवैध वाहतूक करून बऱ्याच ठिकाणी रेतीचा साठा जमा करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे अकोला, शेगाव शहरात रेतीची विक्री करण्यात येत आहेत. रेती माफियांचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या सोबत साटेलोटे असल्यामुळे महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. बाळापूर तहसीलद्वारे व उपविभागीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक र्दुलक्ष करीत आहेत. रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नेमलेले पथक केवळ नावापुरते आहे. तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच रेती माफिया खुलेआम रेतीची चोरीची करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध महसूल विभागाने आतापर्यंत काेणतीही कारवाई केली नाही. महसूल विभागाने रेती माफियांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.