शहरातील ‘ओपन स्पेस’ धनाढ्य व्यावसायिकांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:44+5:302021-04-22T04:18:44+5:30
आयुक्त अराेरा यांनी लक्ष द्यावे ! महापालिकेसाेबत करारनामे करून शहरातील अनेक संस्थांनी ‘ओपन स्पेस’ बळकावले आहेत़ अशा जागेचा ...
आयुक्त अराेरा यांनी लक्ष द्यावे !
महापालिकेसाेबत करारनामे करून शहरातील अनेक संस्थांनी ‘ओपन स्पेस’ बळकावले आहेत़ अशा जागेचा व्यावसायिक वापर केला जात असून परिसरातील रहिवाशांना व लहान मुलांना या ठिकाणी येण्यास सक्त मनाई केली जाते़ ले-आउटमधील नागरिकांच्या हक्काचे हनन हाेत असल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी प्रशासनाकडे केली आहे़ याप्रकरणी नगररचना विभागाची संशयास्पद भूमिका पाहता मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
समितीचा अहवाल गेला काेठे?
मार्च २०१८ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून संपूर्ण शहरातील खुल्या जागांचा अहवाल सादर करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन केले होते. यामध्ये माजी उपमहापौर वैशाली शेळके, गटनेता राहुल देशमुख, बाळ टाले, माजी नगरसेवक डॉ. विनोद बोर्डे, मनपाचे तत्कालीन नगररचनाकार विजय इखार यांचा समावेश होता. या समितीचा अहवाल गेला काेठे, असा सवाल उपस्थित झाला आहे़