मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:34 AM2017-09-09T01:34:24+5:302017-09-09T01:34:34+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत. त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत. त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठात भोंगळ कारभार सुरू असून, अनेक गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी स्थानिक आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे थेट तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तक्रारींबाबत मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे विचारणा केली आणि अहवाल मागितला. मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यावर कुलगुरूंनी चौकशी समिती केली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी महाविद्यालया तील प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी नियुक्ती केली, तसेच मुंबई येथील के.जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उकरांदे, शासनाच्या चीफ अकाउंटंट्स अँण्ड ट्रेझरीचे नवृत्त सहसंचालक बी.जी. निर्मल यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करून ४५ दिवसांमध्ये आपला अहवाल कुरूगुरूंना सादर कर तील.