चोहोट्टा येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर
By ram.deshpande | Published: July 25, 2017 09:01 PM2017-07-25T21:01:28+5:302017-07-25T21:01:45+5:30
चोहोट्टा बाजार : येथील उर्दू शाळेमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिकविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार : येथील उर्दू शाळेमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिकविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चोहोट्टा बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये एकूण आठ वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गात भरगच्च विद्यार्थी संख्या आहे; परंतु वर्ग आठच्या तुलनेत खोल्या सहाच असल्याने मागील काही वर्षांपासून दोन खोल्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना कधी उघड्यावर शिकविण्यात येते तर कधी एकाच वर्गात दोन वर्गांचे विद्यार्थी बसवावे लागतात; परंतु या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडताना दिसून येतो. एका वर्गात दोन वर्गांचे विद्यार्थी बसवावे लागत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावरसुद्धा परिणाम होत आहे. सद्यस्थितीत एका वर्गासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून शाळेतील खोलीचा उपयोग करण्यात येत आहे. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उर्दू शाळेसाठी दोन वाढीव वर्गखोल्यांची सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने करून देण्याची मागणी उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाजीम कुरेशी, उपाध्यक्ष शे. शरीफ यांच्यासह समितीच्या पदाधिकाºयांनी केली आहे.
एका खोलीत दोन वर्ग भरवावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. जि.प. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन दोन खोल्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- नाजीम कुरेशी,
अध्यक्ष, उर्दू शाळा समिती, चोहोट्टा बाजार.