कृषी विद्यापीठाच्या तलावात मूर्ती उघड्यावर; निर्माल्याचा खच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:13+5:302021-09-24T04:22:13+5:30
विद्यापीठाची परवानगी नाही! नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कृषी विद्यापीठाच्या परिसरातील तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात आली नसल्याचे कृषी विद्यापीठाकडून ...
विद्यापीठाची परवानगी नाही!
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कृषी विद्यापीठाच्या परिसरातील तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात आली नसल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले. तरीही कृषी विद्यापीठाच्या आजूबाजूच्या भागातील रहिवासी याठिकाणी मूर्ती विसर्जित करीत आहे.
साफसफाईची जबाबदारी कोणाची?
या तलावात मूर्ती विसर्जनासोबत निर्माल्यही टाकण्यात आले आहे. त्यामुळे तलावाचे पाणी दूषित झाले असून, कृषी विद्यापीठ परिसरात निर्माल्याची दुर्गंधी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तलावाची साफसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, या तलावाची साफसफाईची जबाबदारी महानगरपालिकेची की, कृषी विद्यापीठाची असा प्रश्न निर्माण होत आहे.
महानगरपालिकेला कळविणार...!
तलावामध्ये नागरिकांनी मूर्ती विसर्जित केल्याने जागोजागी खच दिसून येत आहे. येथे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. याबाबत कृषी विद्यापीठ महानगरपालिकेला अवगत करणार असल्याची माहिती आहे.
गार्डचा पहारा तरीही...
४० क्वार्टर रोडवरील तलावावर कृषी विद्यापीठाकडून सुरक्षा रक्षक नेमला आहे. दररोज एक गार्ड येथे पहारा देतो. मात्र, हे नागरिक या गार्डला न जुमानता विसर्जन करीत आहे. दरवर्षी हीच स्थिती असल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले.