सोशल मीडियावर खुलेआम हैदोस!
By admin | Published: August 4, 2016 01:37 AM2016-08-04T01:37:03+5:302016-08-04T01:37:03+5:30
आमंत्रणांचा रतीब; समलिंगी युवकांद्वारे व्हॉट्स अँपचाही होतो वापर.
अकोला, दि. ३- सोशल मीडिया हा आता प्रत्येकाच्या आयुष्याची अनिवार्य गरज झाली आहे. त्याचा वापर कोण कसा करतो, यावर त्याची उपयुक्तता अवलंबून आहे. समलिंगी लोकांनी मात्र सोशल मीडियावर अक्षरक्ष: हैदोस घातला आहे. फेसबुक, ट्विटर, इस्टाग्रामसह व्हॉट्स अँपचा वापर करून जगभरातील मित्र शोधण्याचे नवे साधन म्हणून याचा वापर होत आहे.
अकोल्यासारख्या शहरामधून फेसबुकवर तब्बल सहा पेज २४ तास कार्यरत असल्याचे समोर आले आहे. अनेक समलिंगींनी नाव बदलवून आपले फेसबुक अकाउंट सुरू केले आहे. तुमच्या शहराचे नाव टाकून त्याच्या पुढे ह्यगेह्ण नावाने सर्च केल्यास अनेक फेसबुक ग्रुप अँक्टीव्ह असल्याचे समोर येते. या पेजवर किंवा अशा नावाने असलेल्या अनेक फेसबुक पेजवर समलिंगी युवक नवा सहकारी शोधण्यासाठी स्वत:च्या शरीराची वर्णने देताना दिसतात. या सर्व वर्णनांमध्ये त्याचे वय व त्याचा पंथ यांची माहिती देणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे कोती, पंथी या पारंपरिक शब्दांना नव्या पिढीने ह्यटॉप व बॉटमह्ण असा इंग्रजी साज चढविला आहे. भुसावल ते नागपूर या रेल्वे मार्गावरून प्रवास करणारे अनेक समलिंगी अकोला किंवा शेगाव येथे एक थांबा घेतात. या प्रवासादरम्यान फेसबुकवरून दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करीत नव्या सहकार्यासोबत मैत्री केली जाते. हे आमंत्रण थेट असले तरी सारा मामला हा प्रत्येकाच्या ह्यइन बॉक्सह्ण चॅटिंगमध्येच पक्का होतो, ते मात्र फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केले जात नाही. या वॉलवरच्या पोस्टवर वापरली जाणारी छायाचित्रे ही सहसा इंटरनेटवरून घेतलेली दिसून आली, फक्त काही लोकांनी स्वत:ची प्रोफाइल दिली असल्याने अशा संबंधांना लपवून ठेवण्यापेक्षा मान्यता मिळविण्यासाठीच त्यांचा कल असल्याचे दिसून आले.
खोटी माहिती दिली तर केले जाते ब्लॉक
फेसबुक पेजवर समलिंगीसोबत संवाद साधताना त्यांचे परवलीचे शब्द अर्थात ह्यकोडह्णला प्रतिसाद मिळाला नाही, तर लगेच संबंधिताचे फेसबुक अकाउंट ब्लॉक केले जाते. अशा ब्लॉक केलेल्या अकाउंटचा प्रोफाइल फोटो व अकाउंटचे नाव सर्व समलिंगीपर्यंंत पोहचवून त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा मात्र प्रत्येक फेसबुक पेजवर दिसून येतो, हे विशेष!
मोबाइल अँप्सचेही फ्री डाउनलोडिंग!
फेसबुकप्रमाणेच मोबाइल अँप्स आता उपलब्ध झाले असून, प्ले स्टोअरमध्ये हे अँप्स डाउनलोडिंगसाठी ह्यफ्रीह्ण आहेत. हे अँप्स अँक्टीव्ह केल्यानंतर तुमच्या मोबाइलचे लोकेशन वापरण्याची परवानगी दिल्यास तुमच्या लोकेशनच्या जवळपास अशा स्वरूपाची व्यक्ती त्या अँप्सवर असेल तर त्याच्या नावापुढे ह्यग्रीनह्ण अर्थात ऑनलाइनचा सिग्नल मिळतो. त्यामुळे ही साखळी वाढण्यास मदत होत आहे.