इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:45 PM2018-07-30T14:45:47+5:302018-07-30T14:47:20+5:30
इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अकोला: शालेय विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचार रूजविण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २00९ पासून इन्स्पायर पुरस्कार योजना सुरू केली. २0१६ व १७ पासून इन्स्पायर अवार्डस मानक म्हणून घोषीत करण्यात आले. या इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थी या अवार्डमध्ये सहभागी होऊ शकतात. एका शाळेमधून २ ते ३ विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम विचार निवडून केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर केली जाईल. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापकांद्वारा सर्व शाळेतील मुलांना एकत्र नवविचाराने बदल करण्यासाठी प्रोत्साहित करतील. स्थानिक तांत्रिक समस्या सोडविण्याची एक पद्धत जी एखादा विद्यार्थी रोज त्यांच्या आजुबाजुला घडत असलेल्या कल्पनांचा विचार करतात. ते विचार एका कागदावर त्यांची नोंद करून ते मुख्याध्यापक किंवा शिक्षकाजवळ जमा करावी. जमा केलेल्या कल्पनांचे शालेय स्तरावर परिक्षण केल्यानंतर सर्वोत्तम दोन ते तीन कल्पनांना इन्स्पायर मानक पुरस्कारासाठी अर्जांचे आॅनलाईन नामांकन डीएसटी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर केले जाईल. नवीन विद्यालय संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. विचरांची निवड त्याची नवीनता आणि नवचाराकरीता विद्यार्थ्यांद्वारा दिलेल्या माहितीच्या आधारावर केली जाईल. देशातून एक लाख नवविचार निवडले जातील. सर्व विद्यार्थ्यांना १0 हजार रूपयांचे पुरस्कार डीबीटी अंतर्गत सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मिा करण्यात येईल. जिल्हास्तरीय प्रदर्शनातून १0 हजार नवचारांना निवडणून राज्यस्तरीय प्रदर्शनात पाठविण्यात येईल. यातून एक हजार विद्यार्थी निवडले जातील. निवडलेल्या एक हजार प्रतिकृतींना राष्ट्रीयस्तरावरील प्रदर्शनीत ठेवले जाईल. येथे ६0 सर्वोत्तम प्रतिकृती निवडल्या जातील. या प्रतिकृतींना राष्ट्रपती भवना आयोजित उत्सवामध्ये स्थान दिले जाईल. अर्ज ३१ जुलैपर्यंत स्विकारले जाती. आॅक्टोबरमध्ये नामांकन आणि निधीचे वितरण होईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि डिसेंबरमध्ये राष्ट्रीय प्रदर्शन होईल. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, शब्बीर हुसैन यांनी कळविले. (प्रतिनिधी)