भाजपमधील असंतुष्टांचा विरोधकांना ‘बुस्टर डोस’

By admin | Published: May 6, 2016 02:15 AM2016-05-06T02:15:38+5:302016-05-06T02:15:38+5:30

अकोला मनपात भाजपच्या डोकेदुखीत भर; पक्षाची शिस्त हरवली कोठे?

Opposition BJP's 'booster dos' | भाजपमधील असंतुष्टांचा विरोधकांना ‘बुस्टर डोस’

भाजपमधील असंतुष्टांचा विरोधकांना ‘बुस्टर डोस’

Next

आशिष गावंडे / अकोला
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये विकासकामांचा निपटारा करण्यापेक्षा निधीवाटपावरून अंतर्गत कलह शिगेला पोहोचले आहेत. भाजपमधील काही असंतुष्ट नगरसेवक चक्क विरोधी पक्ष काँग्रेसला हाताशी धरून पक्षाला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नसल्याने शिस्तप्रिय पक्ष म्हणवून मिरवणार्‍या भाजपची पुढील वाटचाल कठीण असल्याचे चित्र दिसत आहे.
ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखवत लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत, केंद्रासह राज्यात सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांच्या कालावधीसाठी का होईना, भाजपने शिवसेनेच्या मदतीने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. त्यापूर्वी केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे निधीवाटपातून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत असे. काँग्रेसच्या धोरणांमुळे अपुरा निधी मिळत असल्याने विकासकामांना विलंब होत असल्याची सबब भाजपकडून नेहमीच पुढे केली जात होती. आता चित्र पूर्णत: बदलले आहे. मनपासह राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असली तरी महापालिकेत निधीवाटपावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या वादंगामुळे पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. सुरुवातीला दीड वर्षांपर्यंत महापौर उज्ज्वला देशमुख विरुद्ध सर्व नगरसेवक असा सामना रंगला असतानाच, आता पक्षात काही असंतुष्ट, महत्त्वाकांक्षी नगरसेवकांचा गट उदयास आला आहे.


होय, भाजप नगरसेवक आमच्या संपर्कात!
सत्तापक्षातील पदाधिकारी निधीवाटपात स्वपक्षीय नगरसेवकांवरसुद्धा अन्याय करीत आहेत. अन्यायाची भावना असल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला जात आहे.

पक्षाच्या अडचणीत वाढ
सत्तापक्ष भाजपला विकासकामांपेक्षा बदनामीचा सामना करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. स्वपक्षीय नगरसेवकांनीच छुपी मोहीम उघडली असून, याचा विरोधकांकडून राजकीय फायदा घेतला जात असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Opposition BJP's 'booster dos'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.