विरोधी पक्षनेते आज अकोला जिल्हा दौ-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 02:18 AM2016-03-04T02:18:32+5:302016-03-04T02:18:32+5:30
दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी.
अकोला: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवार,४ मार्च रोजी अकोला जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सकाळी ९.१५ वाजता गांधीग्राम येथे आगमन होणार आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर परिसरातील शेतकर्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यामध्ये पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार हमी योजनेची कामे याविषयी आढावा घेण्यात येणार आहे. सकाळी १0.१0 वाजता किनखेड पूर्णा येथे आगमन व शेतकर्यांशी संवाद साधल्यानंतर १0.४0 वाजता पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथे ते प्रयाण करतील. ११.३0 वाजता बाभूळगाव येथे, दुपारी १२ वाजता बाभूळगावहून पातूरकडे प्रयाण, १२.१५ वाजता पातूर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. या दौर्यात ते शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, प्रकाश तायडे यांनी केले आहे.