पशुधन महामंडळ स्थानांतरणाला प्रहारचा विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:56+5:302021-02-09T04:20:56+5:30
अकोला : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्याने त्या कार्यालयातील फाइल, अन्य दस्तावेज हलविण्याचे काम रविवारी ...
अकोला : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्याने त्या कार्यालयातील फाइल, अन्य दस्तावेज हलविण्याचे काम रविवारी काही अधिकारी, कर्मचारी करीत होते. सुटीच्या दिवशी सदर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच प्रहार सेवक मनोज पाटील यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर गाडीला घेराव घालीत सर्व फायली या जप्त करीत खदान पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यावेळी सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.
जिल्ह्यात महाबीज आणि पशुसंवर्धन विकास महामंडळ ही दोनच राज्य दर्जाची कार्यालये होती. त्यापैकी एक कार्यालय नागपूर येथे हलविण्यात येत असल्याने हा जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा सूर यावेळी मनोज पाटील यांनी व्यक्त केला. त्यातच रविवारी सुटीच्या दिवशी सदर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी महत्त्वाच्या फायली व दस्तावेज गाडीत भरून नेत असल्याची माहिती मिळताच काही वेळातच प्रहारसेवक मनोज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर कार्यालयावर धाव घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा डाव उधळून लावला. यावेळी त्यांच्या वाहनात भरलेल्या सर्व फायली व दस्तावेज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काढून खदान पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यावेळी काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.