गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:31 PM2020-01-04T12:31:35+5:302020-01-04T12:31:43+5:30
विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील फळवर्गीय फळ पिकांचा अंबिया बहार गळाला असून, संत्र्याचे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या स्थितीत या फळांच्या मृग व येणाºया अंबिया बहाराची काळजी घेण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.
गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात. त्यातून झांडांना संक्रमण होऊन प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलोटोत्रिकम, डिप्लोडिया, आॅनरनारियासारख्या बुरशीचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. पानाला गारांचा मार बसल्याने पाने फाटून गळतात. विदर्भात दोन दिवस पडलेल्या गारपिटीमुळे हे नुकसान झाले आहे. यामुळे सूर्यप्रकाशात झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. झाडांवरील मृग बहाराच्या फळाची मोठ्या प्रमाणात फळगळ होते. अंबिया बहाराची फुले गळतात, अंबिया बहार फुटण्यास विलंब होतो. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम
सततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे मृग बहार असलेल्या बगीचांमधील फळांवर तपकिरी कुज (ब्राऊन राट) या रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण झाडावर फोसेटील २.५ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ५० डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४पावसामुळे कागदी लिंबूवरील खैºया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे संरक्षणासाठी कॉपर आॅक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकºयांनी ही उपाययोजना करावी!
गारपिटीने मोडलेल्या फांद्या आरीच्या साहाय्याने कापून त्या भागावर १:१:१० बोर्डो पेस्ट लावावी. तर बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंतही ही पेस्ट लावावी. साल फाटल्यास १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणाने १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी टाकून स्वच्छ पुसून जखमेवर १:१:१० प्रमाणे बोर्डो पेस्ट लावावी. गारपीटग्रस्त झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम लीटर पाणी किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम लीटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण ६०० ग्रॅम चुना अधिक ६०० ग्रॅम मोरचूद अधिक १०० लीटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.
गारपीट, पाऊस ढगाळ वातावरणामुळे लिंबूवर्गीय पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी, उपाययोजना करावी.
- डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.