संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:24 PM2020-03-31T16:24:40+5:302020-03-31T16:24:48+5:30

विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत

Orange fruit crop hit; Losses on Rs 75 crore! | संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता!

संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता!

Next

अकोला : ‘लॉकडाउन’ आणि अवकाळी पावसाचा संत्रा फळ पिकांना फटका बसला असून, जवळपास ७५ कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत. गत व यावर्षी सतत पाऊस सुरू असून, अवकाळी पावसानेही विदर्भात चांगलेच थैमान घातले आहे. या प्रतिकूल हवामानाचा जबर फटका मृग बहाराच्या संत्र्याला बसला आहे. सध्या अंबिया बहारही झाडला लागला आहे. त्याचीही वादळी पावसामुळे फळगळ सुरू आहे. या प्रतिकूल स्थितीचा सामना शेतकरी करीत असताना कोराना विषाणूने नवे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी फळबागांचे जतन केले. काही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या प्रथम आठवड्यात संत्रा झाडारू न काढला. संत्रा फळात ‘क’ जीवनसत्व असल्याने संत्र्याची मागणीही वाढली होती. शेतकºयांना चांगले दरही मिळत होते. तथापि, कोराना हे वैश्विक संकट निर्माण झाल्याने शासनाला संचारबंदीसारखा निर्णय घ्यावा लागला. परिणामी वाहतूक बंद झाल्याने शेतकºयांना वाहतूक करणे कठीण झाले. परिणामी आजमितीस शेततकºयांकडे संत्रा पडून आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहे.

अवकाळी पाऊस आणि वाहतुकीचा काहीसा परिणाम संत्रा फळावर झाला आहे. जवळपास ५० कोटीवर संत्र्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक, कृषी विभाग, अमरावती.

 

Web Title: Orange fruit crop hit; Losses on Rs 75 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.