संत्रा फळ पिकांची आता एकाच ठिकाणी माहिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:46 PM2017-12-05T12:46:55+5:302017-12-05T12:47:55+5:30

अकोला: संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा फळ पीक नवतंत्रज्ञान, संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) कार्यालयात शेतकºयांसाठी नवे दालन उघडण्यात आले असून, या दालनाचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.

Orange fruit crops information are now in one place! | संत्रा फळ पिकांची आता एकाच ठिकाणी माहिती!

संत्रा फळ पिकांची आता एकाच ठिकाणी माहिती!

ठळक मुद्देप्रयोगशाळा, शेतकरी ग्रंथालयाचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन

अकोला: संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा फळ पीक नवतंत्रज्ञान, संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) कार्यालयात शेतकºयांसाठी नवे दालन उघडण्यात आले असून, या दालनाचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.
या ठिकाणी शेतकºयांना लक्षात येईल अशा पद्धतीने लिंबूवर्गीय फळांची इत्थंभूत माहिती, सुधारित तंत्रज्ञानाचे फलक ठळकपणे लावण्यात आले. सर्व रोग, किडी त्यावरील उपाय, लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्र, सुधारित जाती, नागपूर संत्रा, नागपूर सिडलेस, खुंट, कलमांची निवड, खत व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये ओलीत व्यवस्थापन, वळण व छाटणी, आंतरपिके, तण नियंत्रण, बहार नियोजन, फळगळ, विरळणी, काढणी तसेच संत्रा निर्यात व फळांची प्रतवारी आदीची माहिती उपलब्ध आहे. शेतकºयांसाठी येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, शेतकºयांना शेती, पिकांविषयी भेडसावणाºया विविध प्रश्नांची उत्तरे असलेली पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. शेतकºयांसाठी नि:शुल्क माहितीपत्रकही येथे उपलब्ध आहेत.
सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, वानिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, नियंत्रक विद्या पवार, कीटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. श्रीकांत अहेरकर, डॉ.टी. एच. राठोड, जितू गावंडे, डॉ.आर.एस. नंदनवार, डॉ. नितीन पटके, डॉ. शशांक भराड, डॉ. नीरज सातपुते, प्रसिद्धीप्रमुख डॉ. किशोर बिडवे, डॉ. श्याम घावडे, डॉ. योगेश इंगळे, एस.एम. घाटे, संदीप आसोलकर, स्वाती खंडागळे यांच्यासह सर्वच सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, ज्येष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, अधिकाºयांची उपस्थिती होती. एसआयसीआरपीचे प्रमुख डॉ. दिनेश पैठणकर यांनी यावेळी या प्रकल्पाची माहिती दिली.
 
Web Title: Orange fruit crops information are now in one place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.