शिल्लक साठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार सवलतीच्या दरात धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:38+5:302021-06-01T04:14:38+5:30

संतोष येलकर. अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने ...

Orange ration card holders will get grain at a discounted rate from the remaining stock! | शिल्लक साठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार सवलतीच्या दरात धान्य !

शिल्लक साठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार सवलतीच्या दरात धान्य !

Next

संतोष येलकर.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गतवर्षीच्या शिल्लक धान्यसाठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दराने धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना राज्य शासनामार्फत मे महिन्यात माेफत धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. यासोबतच सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील केशरी रेशन कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय २५ मे रोजी शासनाने घेतला आहे. त्यानुसार केशरी रेशनकार्डधारकांना जून महिन्यात प्रती व्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये ८ रुपये प्रती किलो दराने गहू व १२ रुपये प्रती किलो दराने तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना काळात गतवर्षी केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले होते. त्यावेळी मंजूर धान्यसाठ्यापैकी शिल्लक राहिलेल्या धान्यसाठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण जून महिन्यात करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. गतवर्षी केशरी रेशन कार्डधारकांसाठी मंजूर धान्यसाठ्यापैकी शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

बी. यू. काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

Web Title: Orange ration card holders will get grain at a discounted rate from the remaining stock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.