बाजारातून संत्री गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:17 AM2021-04-12T04:17:24+5:302021-04-12T04:17:24+5:30
जिल्ह्यातील पातूर, अकोट या भागात संत्रीच्या बागा आहेत. असे असले, तरी काही विक्रेते परतवाडा आणि नागपूर या भागांतून संत्री ...
जिल्ह्यातील पातूर, अकोट या भागात संत्रीच्या बागा आहेत. असे असले, तरी काही विक्रेते परतवाडा आणि नागपूर या भागांतून संत्री मागवितात. त्यामुळे शहरात पुरेशी संत्री उपलब्ध असतात. मात्र, सध्या बाहेर जिल्ह्यातून येणारी संत्री बंद झाली आहे व स्थानिक पातळीवरील उत्पादन नाही. स्थानिक माल बाजारात मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येईल. बाहेरून येणाऱ्या मालाची सध्या पुरेशी आवक नसल्याने संत्रीचे दर गगनाला भिडले आहेत.
--बॉक्स--
महिन्याभराआधी १२० रुपये पेटी संत्री मिळत होती. मात्र, बाजारात माल कमीच येत आहे. आता ९०० रुपये देऊन पेटी विकत घ्यावी लागत असल्याचे ज्यूस विक्रेत्याने सांगितले.
--कोट--
संत्रीचा हंगाम सुरू व्हायला वेळ आहे. सध्या संत्री आंबिया बहारात आहे. बाहेर जिल्ह्यातून माल बंद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागांतून संत्रीचा माल येत आहे.
मो.जुनेद, फळ व्यापारी