पेट्रोलपंप कामगारांचे वेतन धनादेशाद्वारे देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:39 AM2017-09-08T01:39:23+5:302017-09-08T01:40:11+5:30
जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप संचालकांकडून कामगारांना किमान वेतन नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने अकोल्यातील सहायक कामगार आयुक्तांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांची बैठक बोलाविली होती. यामध्ये कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यापुढे प्रत्येक कामगाराचे वेतन धनादेशाद्वारेच करण्यात यावे, असा आदेश सहायक आयुक्तांनी यावेळी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप संचालकांकडून कामगारांना किमान वेतन नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने अकोल्यातील सहायक कामगार आयुक्तांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांची बैठक बोलाविली होती. यामध्ये कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यापुढे प्रत्येक कामगाराचे वेतन धनादेशाद्वारेच करण्यात यावे, असा आदेश सहायक आयुक्तांनी यावेळी दिला.
अकोला रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपं पाचे संचालकांनी कामगारांना किमान वेतन न देता शोषण सुरू केले आहे. अनेकांचा भविष्य निवार्ह निधीदेखील नियमित भरला नाही. अशा तक्रारी येथील कर्मचार्यांनी अकोल्यातील सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे नोंदविल्यात.
त्यावर सहायक आयुक्तांनी अकोला पेट्रोलपंप असोसिएशनचे पदाधिकार्यांना पाचारण करून त्यांच्याकडील कर्मचार्यांची माहिती घेतली. १८ वर्षाआ तील मुलांना नोकरीवर ठेवू नका, कामगारांना नियमित वेतन द्या, धनादेशाद्वारेच वेतन द्या, अशा सूचना केल्या त. अकोला पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी महानगरातील संपूर्ण माहिती सहायक आयुक्त यांना दिली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी पेट्रोल पंपांवर कार्यरत कर्मचार्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्यादेखील समजून घेतल्यात. आता यातून काय नवीन मार्ग निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.