'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:47 PM2018-12-12T12:47:59+5:302018-12-12T12:48:23+5:30

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते.

Order to send 'those' 58 camels back to Rajasthan | 'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

googlenewsNext

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. सदर उंटांना पातूरपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.
राजस्थान मधुन तेलगंणा तथा आन्ध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे कत्तलीकरीता ५८ उंटाना १२ डिसेंबर रोजी नेण्यात येत होते. चार राज्यातील पोलीसांच्या हातावर तुरी देउन हे दलाल उंटाचा तस्करीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षे पासुन करीत आहेत. अनेक वेळा उंटाचे कळप हे तेलगंणा आंध्र प्रदेश राज्यात जात असताना त्यांची साधी चौकशी सुध्दा केली जात नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोरखधंदा सुरु असल्याने याची तस्करी करणारे प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनेज करीत असल्याचे वास्तव आहे. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व गौरक्षण चवळवळीत कात करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कळपावर पाळत ठेउन त्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिली होती. यावरुन सदरचा कळप राज्यस्थान वरुन हैद्राबादला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरुन हैदराबाद येथील पशु संरक्षण समीतीचे वण्य संरक्षण विशेष अधीकारी सुरेंद्र भंडारी, दीनेश अपलीया , महीप जैन यांनी पातुर पोलिसांना सोबत घेउन पकडला होता. त्यानंतर विजय बोरकर यांनी या प्रकरणाची पातुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पातुर पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळाकाढूपणा करीत या तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरीष्ठ स्तरावरुन दबाव आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही उंट खरेदी करून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील भवरलाल व वक्ताराम यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यासाठी न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आदेश दिले असून सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.उंट हा अतिसंरक्षीत प्राणी असतांनाही कत्तलीसाठी वाहतुक होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र या उंटांना जीवनदान देण्यासाठी संजय वाघमारे तसेच वनराई गोशाळा अध्यक्ष श्रीकांत बोरकर यांनी विशेष मदत केली.

 

Web Title: Order to send 'those' 58 camels back to Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.