दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:35 PM2018-12-18T13:35:23+5:302018-12-18T13:35:36+5:30
फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.
अकोला: राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून, या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.
शासनाने अकोला जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त केले आहेत. या तालुक्यामधील गावांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिवांकडून परत करण्यात येणार आहे. या दृष्टिकोनातून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या पात्र इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी तातडीने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती वेगवेगळी सादर करावी. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, इंडेक्स नंबर, शाळेचा पत्ता, मुख्याध्यापक, प्राचार्यांचे नाव, विद्यार्थ्यांचे मूळ गाव, बँक खाते क्रमांक, शाखेचे नाव, आयएफएससी कोड, विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, शाखा आदी माहिती सादर करावी, असे निर्देेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)