पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत निलंबनाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:18 PM2020-01-15T19:18:07+5:302020-01-15T19:18:19+5:30
कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
अकोला : अपंग कल्याणाचा निधी खर्च न करणाºया महापालिकेच्या संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिला. सोबतच अकोला शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये निर्माण होणाºया धुळीला जबाबदार सर्वसंबंधितांवर फौजदारी कारवाई करा, यापुढे सर्वसामान्यांची कामे, कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांची पहिलीच बैठक बुधवारी झाली. यावेळी विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. कामांमध्ये प्रशासकीय पातळीवर दिरंगाई करणे, सर्वसामान्यांना त्रास देण्याची कार्यपद्धती असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांसाठी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. अधिकारी-कर्मचाºयांची जबाबदारी आणि कर्तव्य असलेल्या कोणत्याही कामाची तक्रार आपल्याकडे यायला नको. जिल्हास्तरीय बैठकांमध्ये शासकीय धोरण, अंमलबजावणीमधील अडथळे, निधीची कमतरता, तसेच शासनाकडे पाठपुरावा करावे लागणाºया विषयांची दखल घेतली जाईल. सर्वसामान्यांच्या कामाबद्दल कोणत्याही अधिकारी-कर्मचाºयांनी सेवा हमी कायद्यानुसार कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार आल्यास स्वतासह इतर कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.